Today news, सामाजिक कार्यकर्त्या, जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. सविता पानट यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर ता.23 / प्रतिनिधी - मराठवाड्यातील जेष्ठ स्त्रीरोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता पानट यांचे  मंगळवारी (ता.22) निधन झाले. त्या 80 वर्षाच्या होत्या. प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ.पानट  यांचा विविध सामाजिक संस्थांशी संबंध होता. डॉ. पानट यांनी साकार या अनाथ आणि निराधार बालक दत्तक प्रक्रिया केंद्राद्वारे सामाजिक कार्य उभे केले. जेष्ठ पत्रकार तथा स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या कन्या तर अंबाजोगाई येथील शासकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. प्रभाकर यांच्या त्या पत्नी होत.अरुण, अशोक आणि निशिकांत भालेराव यांच्या त्या बहीण होत.
डॉ. पानट यांच्यावर प्रागतिक विचारांचा प्रभाव होता.छञपती संभाजीनगर शहरातील सामाजिक,शैक्षणिक व साहित्यिक चळवळीशी त्यांचा संबंध होता..डॉ. पानट या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होत्या उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती डॉ. प्रभाकर पानट, मुलगा डॉ. मंगेश, सून डॉ.वीणा तसेच मुलगी, जावई, नातवंडे तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments