वैजापूर, ता.1/ प्रतिनिधी - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास' योजनेतंर्गत तालुक्यातील महालगाव येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूलमध्ये 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' या योजनेतंर्गत शाळेतील विद्यार्थीनींना मोफत योजनेचे पास वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक जे. बी. नारळे ह होते तर वैजापुर आगाराचे वरिष्ठ लिपीक आजिनाथ मुळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. शाळेत बाहेरगावाहून येणाऱ्या चोरवाघलगाव, सिरसगाव, चिंचडगाव, भगूर फाटा येथील एकूण ५५ विद्यार्थीनींना पासचे वितरण यावेळी करण्यात आले तर प्रवासादरम्यानच्या अनेक समस्या यावेळी सहायक वाहतूक अधिक्षक गोपाल पगारे यांच्या समोर विद्यार्थीनींनी मांडल्यानंतर मुलींची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शालेय वेळेनुसार स्वतंत्र बस सुरु करण्यात येईल. तसेच अकोली वाडगाव, चौदा मैल येथील विद्यार्थ्यांसाठीही नवीन बससेवा सुरु करण्या संदर्भात विचार करून लवकरच अकोलीवाडगाव या मार्गाची पाहणी केली जाईल. तसेच त्यांना पास उपलब्ध करुन देण्यात येतील. अकोलीवाडगाव येथील मुलांची होणारी गैरसोय टाळण्यात येईल असे आश्वासन यावेळी सहायक वाहतूक अधिकारी पगारे यांनी दिले. तसेच जास्तीत जास्त मुलींनी मोफत पास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे. बी. नारळे यांनी स्वतंत्र बसची मागणी करणारे निवेदनही दिले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
0 Comments