news today, अनंत काळाची उदासीनता आणि सीन घालवण्याची क्षमता फक्त संत दर्शनात - रामराव महाराज ढोक


वैजापूर, ता.05 / प्रतिनिधी - व्यक्ती जीवनातील अनंत काळाचा सीन व उदासीनता घालविण्याची क्षमता फक्त संत दर्शनात आहे, म्हणून संतांचे दर्शन करणारे आपले जीवन धन्य करतात असे अमृततुल्य वचन रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांनी मंगळवारी (ता.05) तालुक्यातील तलवाडा गावात सुरू असलेल्या श्री संत बहिणाबाई महाराज यांच्या 46 व्या फिरत्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहात केले. 


ते पुढे म्हणाले की, ईश्वरकृपा झाल्यावरच संत भेटत असतात. यासाठी ब्रह्मलिन झालेल्या संतांच्या नावे जे सप्ताह दरवर्षी आयोजित केल्या जातात ती काळाची गरज आहे. सप्ताहमुळेच समाजात नैतिकता, सामाजिक व नैतिक मूल्ये टिकून आहेत. असे ही ढोक महाराज म्हणाले. तालुक्यातील शिवूर येथील श्री. संत बहिणाबाई महाराज संस्थांचा हा 46 वा अखंड हरिनाम सप्ताह तलवाडा येथे या संपन्न होत आहे.

 तलवाडा ग्राम  पंचक्रोशीतील भक्त - भाविकांनी या सप्ताहाचे नारळ घेतले होते. मंगळवारी या सप्ताहस्थळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, संजय पाटील निकम, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, महाराष्ट्र  नारायणी सेनेचे
प्रदेशाध्यक्ष सेवानिवृत्त तलाठी अशोक आप्पा पवार खंडाळकर, कैलास पवार आदींची उपस्थिती होती. या सर्वांनी ह.भ.प. ढोक महाराज यांचे पूजन केले. अशोक पवार व धोंडीरामसिंह राजपूत यांनी ढोक महाराज यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित केले. या सप्ताहात मोठ्याप्रमाणात भक्त भाविकांनी गर्दी केली होती. महाराजांच्या कीर्तनानंतर उपस्थित सर्व भक्त भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. तलवाडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षक व सेवेकरी परिश्रम घेत आहेत.


Post a Comment

0 Comments