news today, वैजापूर तालुक्यात पोळा सण उत्साहात साजरा

 
 आ.रमेश पाटील बोरणारे यांनी आपल्या गावी चिंचडगांव   येथे पोळा सण साजरा केला....

वैजापूर, ता. 22/प्रतिनिधी - आज अखंड महाराष्ट्रभर साजरा होणारा श्रावण पोळा हा बैलांचा सण वैजापूर शहर व ग्रामीण भागात उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवून डिजे, ढोल ताशा व पारंपारिक वाद्यासह त्यांची गावातून मिरवणूक काढून ग्रामदेवता मारुतीला प्रदक्षिणा घातली.


शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी शेतकऱ्यांचा जिवलग मित्र म्हणजे बैल. दारात यांत्रिकीकरणाचे अत्याधुनिक जेसीबी, ट्रॅक्टरसह सर्व औजारे उभी असली तरी हाडांच्या शेतकऱ्यांच्या गोठ्यात दावणीला सर्जा राजाची जोडी  असल्याशिवाय त्याला चैन पडत नाही.आज साजरा होणाऱ्या पोळ्या निमित्ताने बाजार पेठेत आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजविण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासून बाजारात गर्दी केली होती.भाव वाढलेले असले तरी हौसेखातर रंगबिरंगी मोरक्यांची सजावट खरेदी करताना शेतकरी दिसत होते

Post a Comment

0 Comments