राज्यात सद्या अ आणि ब वर्गातील 3 हजार188 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  यात सहकारी बँका, साखर कारखाने, गृहनिर्माण वित्तीय महामंडळ, सूत गिरण्या, बाजार समित्या, गृहनिर्माण संस्था,आणि बँकांचा समावेश आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करून त्या 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशी माहिती अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी दिली.
राज्यात आतापर्यंत 30 जिल्ह्यात सरासरीच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून शेतकरी खरीप हंगामातील शेतीविषयक कामात व्यग्र असल्याने ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळं पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.
 
0 Comments