news today, वैजापूर तालुका कृषी कार्यालयातर्फे कनकसागज येथे शाश्वत शेती दिन साजरा


वैजापूर, ता.08 / प्रतिनिधी - तालुक्यातील कनकसागज येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय वैजापूर यांच्यावतीने भारतरत्न डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त शाश्वत शेती दिन साजरा करण्यात आला .तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अनेक गावात हा कार्यक्रम घेण्यात आला.

उप कृषी अधिकारी माधव गांगुर्डे यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या शेतीविषयक कार्याची माहिती उपस्थित शेतकरी बांधवांना दिली .तसेच खरीप हंगामातील मका व कापूस पिकावरील मित्र किडी व शत्रू किडी यांची ओळख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर करून दिली. सध्या पावसाचा खंड पडल्यामुळे कपाशी पिकावर रस शोषक किडी मावा ,तुडतुडे ,फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्लोरोपायरीफॉस 20 इसी 2 मिली  प्रति लिटर पाणी+निमार्क ची फवारणी करावी तसेच भुईमूग व कांदा रोपवाटिकेमध्ये हुमणी कीड प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यासाठी क्लोरोपायरीफॉस 50 इसी  दोन मिली प्रति लिटर पाण्यातून ड्रेंचिंग करावी किंवा जैविक औषधी मध्ये मेटेरायझियम ॲनिसोपली पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा बिवेरिया बेसियानाची ड्रेंचिंग करावी याविषयी मार्गदर्शन केले .

सहाय्यक कृषी अधिकारी राजेंद्र पंडोरे यांनी घरच्या घरी जैविक कीडनाशके यामध्ये लमित ,दशपर्णी अर्क ,निंबोळी अर्क तयार करून फवारणी करण्याविषयी मार्गदर्शन केले .कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी ठकाजी खेमनार ,कृषी मित्र मनोज गुंजाळ, नवनाथ गुंजाळ ,पोपट शेळके ,रामेश्वर गुंजाळ, गोविंद गुंजाळ ,संदीप गुंजाळ ,ज्ञानेश्वर गुंजाळ, एकनाथ गुंजाळ, हरिश्चंद्र शिंदे ,अजित बुट्टे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments