वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्याहस्ते उदघाटन प
वैजापूर, ता.08 / प्रतिनिधी - आपला पक्ष सत्तेत नाही, माजी आमदार, खासदार सोबत नाहीत. असे असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून येतील अशा जागांवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करून ते उमेदवार निवडून येतील यासाठी काम करा व वैजापूर विधानसभा मतदार संघात आपली ताकद नव्याने उभी करा जेणेकरून विरोधकांची हवा गरम होईल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष जुबेर चाऊस यांच्या शिवराई रस्त्यावरील संपर्क कार्यालयाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजित कारकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
शशिकांत शिंदे हे बुधवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथे मेळाव्यासाठी जात असताना वैजापूर येथे थांबले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या हस्ते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांच्यासोबत माजी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार संजय वाघचौरे,जिल्हाधक्ष पांडुरंग तागडे, प्रदेश सरचिटणीस प्राचार्य सलीम, युवक जिल्हध्यक्ष अतुल गावंडे, शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष अनिल सुरडकर, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रकाश ठुबे, शहरध्यक्ष जुबेर चाऊस व विधानसभा अध्यक्ष राजू कराळे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही मागील निवडणुकीत जितक्या जागा लढवल्या तेव्हढ्या जागांवर विजय मिळावला. त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या जागांवर लक्ष केंद्रित करा. सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचा. त्यांच्या अडी अडचणी समजून घ्या. कार्यालयच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवा. त्यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयाला भेट द्या व आपली भूमीका प्रशासनासमोर मांडा असा सल्ला त्यांनी दिला. २०२९ च्या निवडणुकीत आपलेच सरकार सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0 Comments