news today, वैजापूर येथे चातुर्मासनिमीत्त जैन साध्वींचे आगमन ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जैन श्रावक संघ वैजापूर तर्फे विविध समित्या गठीत


वैजापूर, ता.07 / प्रतिनिधी - चतुर्मासनिमित्त प.पूज्य पुष्पचुलाजी म.सा.आदी ठाणा 5 यांचे भव्य मिरवणुकीने येथील जैन स्थानकात आगमन झाले आहे. श्री.वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ वैजापूरतर्फे साध्वींचे भव्य स्वागत करण्यात आले.
या मिरवणुकीस शहरातील बालाजीनगर येथील अमृतलाल बोथरा यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. मिरवणुकीत अकरा जोडप्यांनी आगम ग्रंथ घेऊन सहभागी होत शोभा वाढवली.  साध्वीजींसह जैन समाजातील युवक - युवती व महिलांनी सहभाग घेतला. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक जैन स्थानकात पोहचली. माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, संजय पाटील बोरनारे यांनी जैन श्रावक संघातर्फे साध्वींचे स्वागत केले.
राष्ट्रसंत आचार्य सम्राट पु.श्री.आनंदऋषिजी म.सा.तथा  समतासागर, प. पु. विनयकंवरजी म.सा.श्री.अज्ञानुवर्धिनी महाराष्ट्र प्रवर्तिनी, संथारा व्रत साधिका श्रीमनीससूर्य डॉ.प.पु. ज्ञानप्रभाजी म.सा.यांच्या शिष्या असलेल्या पु.श्री.पुष्पचुलाजी म.सा. पु.श्री. सुप्रियदर्शनाजी म.सा.पु.श्री. नियमदर्शनाजी म.सा., पु.श्री.प्रियलश्रीजी म.सा.व अंशुश्रीजी म.सा.या साध्वींचे चातुर्मास निमित्त शहरात आगमन झाले आहे.
चातुर्मास प्रवेशासाठी वडगांव शेरी, बिबेवाडी, मालेगांव,शिर्डी, जळगाव, पंढरपूर, नाशिक, चाळीसगाव, पुणे, राहुरी आदी ठिकाणांहून शेकडो भाविकांची उपस्थिती होती. या आगमन मिरवणुकीचे आयोजन उद्योगपती जीवनलाल संचेती व रवींद्र उर्फ बाळासाहेब संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात होते तसेच आपल्या प्रस्तावात महाप्रसादाची व्यवस्थाही संचेती परिवाराकडून करण्यात आली होती. महाप्रसादाचे या मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी चातुर्मास समितीचे अध्यक्ष अमृतलाल बोथरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

चातुर्मासानिमित्त विविध समित्यांचे गठण 

उद्योगपती जिवनलाल बन्सीलाल संचेती, मर्चंट बँकेचे अध्यक्ष रविंद्र बन्सीलाल संचेती, मेजर सुभाष संचेती, शोभाचंद संचेती, प्रकाशचंद बोथरा हेमंत संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली चातुर्मास निमित्त विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. 
                
                 चातुर्मास समिती  - 2025
अध्यक्ष -    अमृतलाल प्रकाशचंद बोथरा 
उपाध्यक्ष -   राजेंद्र पन्नालाल पारख
कोषाध्यक्ष - रुपेश बाबुलाल संचेती 
आवास - निवास समिती - प्रवीण पुखराज संचेती, अमित शांतीलाल संचेती
प्रचार - प्रसार समिती - प्रफुल्ल रतीलाल संचेती, निलेश मदनलाल पारख
भोजन समिती - स्वजल सुभाषचंद संचेती, आनंद हिरालाल संचेती
वयावच्च समिती - महेश जिवनलाल पारख, अक्षय मनिषकुमार संचेती, रौनक संतोषकुमार बोथरा 


                         






Post a Comment

0 Comments