वैजापूर - गंगापूर रस्त्यावरील चोरवाघलगाव जवळील घटना
वैजापूर,ता. 06 / प्रतिनिधी - भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात वैजापूर गंगापूर रस्त्यावर चोरवाघलगाव शिवारात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला.
रामेश्वर कारभारी गोरे (वय 26 वर्ष) रा. टाकळीसागज ता. वैजापूर असे मयत तरुणाचे नाव आहे.
रामेश्वर गोरे हे महालगाव येथून मोटारसायकलवर (एम. एच. 03 ए. पी. 9049) घरी टाकळीसागज येथे जात होते..त्यावेळी चोर वाघलगाव शिवारात समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एम. एच. 20 जी. झेड. 1838) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत गोरे यांचा जागीच मृत्यू झाला..या कारवर भारत सरकार असे लिहीलेले आहे..गोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
या या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments