news today, वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात अंग व अवयवदान जनजागृती कार्यक्रम संपन्न


अंगदान-- अवयवदान संजीवनी अभियान:ही लोकचळवळ व्हावी -- ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत

वैजापूर-ता.07/. प्रतिनिधी - केंद्र व राज्य सरकार यांच्याद्वारे संपूर्ण देशात 3 ऑगस्ट ते15 ऑगस्ट दरम्यान अंगदान-अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.. सरकारचे हे अभियान लोकचळवळ व्हावी यासाठी आरोग्य खात्यातील कर्मचारी,अधिकारी, गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व खाजगी मंडळे व संस्था यांनी सर्वंकष प्रयत्न करावे असे आवाहन  सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले.  वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित अंगदान-अवयवदान  जनजागृती कार्यक्रमात गुरुवारी (ता. 07)  केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.एन. मोरे होते. करमाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज डोंगळीकर,  वैद्यकीय अधिकारी डॉ.साळवे व डॉ. दिपमाला परदेशी यांची यावेळी प्रमुख.उपस्थिती होती. आयोजक क्ष-किरण तज्ज्ञ वैद्यक किशोर वाघुले यांनी या प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास ग्रामीण व शहरी भागातील रुग्ण व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सूत्र संचलन किशोर वाघुले यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत दुबे यांनी मानले.
या प्रसंगी नर्सिंग अधिकारी आर. व्ही. गवई, श्रीमती जंगम सिस्टर, श्रीमती रोकडे, श्रीमती शिरीन, मनीषा मुळे, श्रीमती पाटील सिस्टर, आरोग्य सहायक श्याम उचित, श्री,चौधरी, अर्चना धात्रक, कल्पना जाधव, पंकज कांबळे, विजय पाटील, शशिकांत पाटील, शेळके सिस्टर, पांडे सिस्टर, लघाने पाटील, वैभव चौधरी, श्री विनकर यांनी सहभाग नोंदविला.

जे नागरिक अवयवदान व अंगदान करतील त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार सन्मान 15 ऑगस्ट रोजी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री करणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव व अंगदानसाठी पुढे यावे असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.एन.मोरे यांनी केले, आयोजक किशोर वाघुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


 

Post a Comment

0 Comments