मानवाचा आहार हा सात्विक असावा - मंहत रामगिरी महाराज
वैजापूर , ता.04 / प्रतिनिधी - ज्याप्रमाणे मधमाशी विविध फुले झाडांपासून फुलातील मकरंद गोळा करत त्यापासून मत बनवते याप्रमाणेच सदगुरुंच्या परंपरेतील आमटी भाकरीचा महाप्रसाद म्हणजे गोरगरीब, लहान थोर, विविध जाती धर्मातील घराघरातून या सप्ताहात येणाऱ्या भाकरी व भजनाच्या मंत्रोपचारात भक्तिमय वातावरणात तयार होणारी आमटी अमृतासम असून आपण जे खातो त्याचप्रमाणे आपली मन बुद्धी बनत असते म्हणूनच मानवाचा आहार हा शाकाहार असून तो सात्विक असावा असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी शनि देवगांव येथे सुरू असलेल्या योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांना उपदेश देताना केले.
वारकऱ्यांचा महाकुंभ समजला जाणारा योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर तालुक्यातील शनि देवगाव व सप्ताक्रोशीत सुरू असून रोज अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील भाविकांची अलोट गर्दी होत आहे. सप्ताहच्या पाचव्या दिवशी चार ते पाच लाख भाविकांनी सप्ताहास हजेरी लावली व आमटी भाकरीचा महाप्रसाद घेतला. याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश पाटील बोरणारे, आमदार हेमत ओगले, माजी सभापती अविनाश पाटील गंलाडे, माजी सभापती संतोष पातील जाधव, माजी सभापती बाबासाहेब पातील जगताप, करण ससाणे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योगानंद महाराज, विकम महाराज, सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर मधुकर महाराज यांच्यासह लाखो भाविकाची उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनाचाही लाखो भाविक घेत आहेत लाभ ..
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोदाधाम सरला बेट बेटाचा वारकरी भाविक भक्त हा शेतकरी कुटुंबातील किंवा शेतीशी निगडित असल्याने प्रत्येक वर्षी सप्ताहामध्ये कृषी प्रदर्शन भरवल्या जाते , आपली भारतीय संस्कृती ही ऋषी व कृषी प्रधान असून शनिदेव गाव येथील 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहात शेकडो एकर परिसरात भव्य असे कृषी प्रदर्शन आयोजित केल्या असून, यामध्ये 300 च्या वर विविध कंपन्यांचे शेती अवजारे आधुनिक तंत्रज्ञान विविध मशनरी व कृषी निगडित तंत्रज्ञान पाहण्यास मिळते. या प्रदर्शनामध्येही भव्य अशी गर्दी होताना दिसत आहे. सप्ताहातील ज्ञानदान अन्नदानाबरोबरच कृषी ज्ञान ही वारकरी, शेतकरी घेत आहे.
0 Comments