खंडाळा येथे झालेल्या पुणेगाव-दरसवाडी पाटपाणी कृती समितीच्या बैठकीत निर्णय
ताराचंद वेळंजकर
----------------------------
खंडाळा ता.25 - वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे
पुणेगावव - दरसवाडी पाटपाणी समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वैजापूर
तालुक्यातील डोंगरथडी भागात पुणेगाव - दरसवाडी धरणातील पाणी कसे येईल व कायम दुष्काळग्रस्त राहणारा भाग सिंचनाखाली कसा येईल यावर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने पुणेगाव-दरसवाडीचे पाणी वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात व विनायक सहकारी साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
पुणेगाव-दरसवाडीचा पाणी प्रश्न पेटणार असून, या पुढील काळात साखळी उपोषण करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला.. या प्रश्नांवर येत्या एक सप्टेंबर पासून सध्या सात दिवसाकरता साखळी उपोषण करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून हे उपोषण लगातार चालण्यासाठी याच कालावधीत पुढील गावाची नावे जाहीर होणार आहे.तालुक्यातील तिडी- मकरनपूर, नालेगाव, जरुळ पानगव्हाण, खंडाळा, रोटेगाव, धोंदलगाव या सात गावांतील शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये उपोषण करणार आहेत. गोदावरीत वाहून जाणारे पाणी, गोदावरी खोऱ्यात कसे येईल यासाठी शासनाने प्रयत्न करावा यावरही या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला
या बैठकीस पुणेगाव-दरसवाडी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष दादा पाटील घायवट, कार्यकारी अध्यक्ष नवी पटेल, सरचिटणीस भास्कर शिंदे, सदस्य बिपिन साळे, ताराचंद वेळंजकर, श्रावण शिंदे, पोपट घायवट, सत्तार कुरेशी, दिगंबर मतसागर, राजेंद्र सातपुते, अशोक काकडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
0 Comments