news today, मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम ? सुप्रिया सुळे

दिंडोरी ता.25 - माझ्या पांडुरंगाला जर मी मटण खाल्लेले चालते तर तुम्हाला काय अडचण आहे ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता.23) खेडगाव येथे बोलतांना केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पत्ते तुम्ही खेळायचे आणि न्यायालयात चकरा आम्ही मारायच्या का ? असे सुनावत तुमचा व्हिडिओ कोणी काढला '? अशा शब्दात सुळे यांनी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली. खेडगाव येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी त्या आल्या होत्या.निवडणुकीत मते मिळविण्यासाठी घोषणा केलेल्या योजनांवर अमाप खर्च केल्याने आता सरकारवर दिवाळखोरीची वेळ आलेली आहे, असे त्या म्हणाल्या.

मी रामकृष्ण हरी वाली आहे,फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते. खरं बोलते, मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही.आणि मी मटण खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. असा प्रश्न खा.सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या या विधानाने वादळ उठलं असून सुळे यांच्या या वक्तव्याचा वारकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला. पित्याने कधी पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकलं नाही तर मुलीकडून काय अपेक्षा करणार ? अशी टीका आळंदीचे बाळासाहेब महाराज खरात यांनी केली.
श्रावण नुकताच संपला, अनेकांनी एक महिना तोंडावर संयम ठेवला होता. श्रावणात अनेक जण मांसाहार करत नाहीत. श्रावण संपताच मांसाहारावरून पुन्हा राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments