news today, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यपातळीवर आघाडी नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती संभाजीनगर, ता.26 - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकीसाठी राज्य पातळीवर कोणत्याही प्रकारची आघाडी केली जाणार नाही.आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत.महविकास आघाडीच्या घटक पक्षांशी स्थानिक पातळीवर चर्चा करावी. स्थानिक पातळीवर एकमत होततर आघाडी करावी. असे धोरण पक्षाने ठरविले आहे. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी  पत्रकारांशी बोलतांना दिली.

काँग्रेसच्या मराठवाडास्तरीय पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक छञपती संभाजीनगर येथे सोमवारी (ता.25) झाली. बैठकीस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात,आमदार अमित देशमुख, विश्वजीत कदम, ज्येष्ट नेते मधुकरराव चव्हाण,खासदार कल्याण काळे, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली आढावा बैठक आज येथे झाली. स्थानिक पातळीवर कार्यकर्ता मजबूत व्हावा हे पक्षाचे धोरण असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात यावा असा निर्णय पक्षाने घेतला आहे. 

Post a Comment

0 Comments