शेतकरी संघटनांची दुसरी विभागीय बैठक छञपती संभाजीनगर येथे पार पडली. त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना प्रहार संघटनेचे आ.बच्चू कडू, महादेव जानकर व इतर
शेतकरी कर्जमाफीसह विविध प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाचे
नियोजन करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची राज्यात स्थापना झाली आहे.त्याची दुसरी विभागीय बैठक आज छञपती संभाजीनगरमध्ये झाली. यावेळी आ. बच्चू कडू, महादेव जानकर, विजय जावंधिया, डॉ.अजित नवले,आमदार कैलास पाटील,अनिल धनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, विजय कुंभार, काशिनाथ जाधव यांच्यासह विविध शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीनंतर त्यानी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, सरकार दरवेळी या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आश्वासन देते. त्याची पूर्तता मात्र करत नाही. शेतकरी कर्जमाफीबद्दल ठोस निर्णय घेतला गेला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अनुत्तरित आहेत.या सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी आम्ही 28 ऑक्टोबरला मुंबईत राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करणार आहोत. महादेव जानकर म्हणाले की, शेतकऱ्याना न्याय मिळावा ही आमची भूमिका असून ही चळवळ महाराष्ट्रभर उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे.
20 टक्के हमी भाव मिळावा, एमएसपी व शेतमजुरीत वाढ व्हावी यासह अन्य मागण्या आम्ही सरकारसमोर मांडणार आहोत असे विजय जावंधिया म्हणाले.
0 Comments