लाडगाव रोडवरील मधुकर सवई या ग्राहकाच्या मीटरमध्ये फेरफार 12 हजार 730 रुपयांची वीज चोरी उघड
वैजापूर, ता.29/ प्रतिनिधी -महावितरणच्या टीओडी मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याप्रकरणी वैजापूर शहरातील एका ग्राहकासह मीटरमध्ये फेरफार करून देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.
महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी मिटर सर्वत्र बसवले जात आहेत.. या टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असल्याने मीटरचा रियल टाईम डाटा उपलब्ध होतो. मीटर नादुरुस्त झाल्याची तसेच मीटर मध्ये कोणी फेरफार केला तर त्याची थेट माहिती त्याचक्षणी महावितरणला मिळत आहे. अशा ग्राहकांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर वीज चोरी पकडली जात आहे.
महावितरणने गेल्या काही दिवसात केलेल्या तपासणीत टीओडी मीटरमध्ये वीज चोरी केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. ग्रामीण भागातही हा प्रकार उघडकीस आला आहे.
महावितरणच्या वैजापूर शहर शाखेचे सहाय्यक अभियंता चेतन
लिहे, पी.एम. मोरे, प्रधान तंत्रज्ञ आर. के. इंगळे यांनी वैजापूर शहरातील लाडगाव रोड येथे तपासणी केली असता मधुकर सिताराम सवई या ग्राहकाच्या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी चालू असल्याचे निदर्शनास आले. सवईने महावितरणचे 12 हजार 730 रुपयांचे नुकसान केले असून या प्रकरणी वितरण विभागाचे अभियंता लिहे यांच्या फिर्यादीवरून वीज ग्राहक सवई व मीटरमध्ये फेरफार करून देणारा शेख आयुब शेख चांद यांच्याविरुध्द विद्युत कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments