भाकरी, पाणी, चटणी, मिरची, ठेचा, लोणचे घेऊन वाकला सर्कलमधील गावांची आपुलकीची शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना
लोणी खुर्द, ता.30/प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील वाकला सर्कल मधील लोणी खुर्द गावासह वाकला,वतलवाडा, भादली, चिकटगाव, बाभूळतेल, अंचलगाव ,खरज,तित्तरखेडा, टुनकी, दस्कूली, निमगाव आदी गावांनी आपुलकीची शिदोरी जमा करून मुंबईच्या दिशेने गाड्यांची आगे कूच केली आहे. लोणी खुर्द व पंचक्रोशीतील गावांनी मनोज दादा जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात मुंबई येथील आंदोलनात सहभागी झालेल्या समाज बांधवांचे अन्न ,पाणी आदी सुविधांपासून अडवणूक झाल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ?.
करीता " एक घर एक शिदोरी" म्हणून लोणी खुर्द ग्रामस्थ व पंचक्रोशीतील गावांनी दोन पिकअपभर शिदोरी व काही दातृत्व यांनी तर काही इतर समाज दात्यांनी एक पिकअप बिस्किट, पाणी बाॅक्स, शेव चीवडा तर काहींनी रोख स्वरूपात मुबई जवळपास गेल्यावर खाद्य पदार्थ खरेदीसाठी अर्थसहाय्य
केले. तीन पिकअप ही खाद्य सामुग्री घेऊन रवाना झाल्या. लोणी खुर्द येथील तरुण समाजबांधवांनी ही पोहच व वाटप व्यवस्था स्विकारली आहे.
हा उपक्रम वैजापूर तालुक्यातील इतर गावांनी देखील राबवावा. आदरणीय मनोज दादा जरांगे यांची आरक्षणाची अंतिम लढाई जिंकण्यासाठी मुंबई येथील आंदोलनकर्ते बांधवांना "एक घर एक शिदोरी" कमीत कमी पाच भाकरी व सोबत चटणी असा पाठवावा. असे आव्हान तरुणांनी केली आहे.
आपुलकीच्या शिदोरीत जमा झालेले साहित्य....
1 क्विंटल मिरची ठेसा, 1 क्विंटल लोणचे, 10,000 बिस्कीट पुडे, 3 पिकअप भरून भाकरी, 70 किलो फरसाण व जवळपास , दहा हजार लोक जेवण करतील एवढ्या भाकरी जमा झाल्या आहे. 50 किलो फुटाणे, 50 किलो शेंगदाणे,1 क्विंटल चिवडा.
एक टेम्पो पाणी बॉटल बॉक्स या वस्तूंचा आपुलकीच्या शिदोरीत समावेश आहे.
0 Comments