मुंबई, ता.15 - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 2016 पासून सुरू झालेल्या आंदोलनात आतापर्यंत 254 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणांच्या वारसांना आर्थिक मदत तसेच नोकरीची मागणी मराठा अंदोलकांकडून करण्यात आली होती. ही मागणी सरकारने मान्य केल्यानंतर आतापर्यंत 158 वारसांना प्रत्येकी 10 लाखांप्रमाणे 15 कोटी 80 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.मात्र, अद्यापही 96 वारसदार हे मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
आतापर्यंत 45 वारस नोकरीसाठी पात्र ठरल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा आंदोलकांच्या 158 जणांच्या वारसांना 15 कोटी 80 लाखांची मदत पुरविण्यात आल्यानंतर काही कागदपत्रांच्या अभावामुळे तब्बल 96 वारसदारांची आर्थिक मदत होती. मात्र, मनोज जरांगे यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर या रखडलेल्या आर्थिक मदतीसाठी तत्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. पात्रते निकष तपासून तत्काळ मदतीची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
0 Comments