वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच मेळावा उत्साहात संपन्न ; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र
वैजापूर, ता 15 - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी आपसातील हेवेदावे विसरून पक्षाच्या कामाला अधिक वेग देण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी रविवारी (ता.14) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वैजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या सुरुवातीला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार सतीश चव्हाण यांनी पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कामाला अधिक वेग देण्याचे आवाहन केले. शेवटी महिला आघाडीच्या ॲड. ज्योती कापसे यांनी आभार मानले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसक्या जिल्हाध्यक्ष स्वातीताई कोल्हे, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकीलशेठ, प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सय्यद अहेमदअली, तालुकाध्यक्ष पंकज ठोंबरे, युवक जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, महिला शहराध्यक्ष ज्योतीताई कापसे, महिला तालुकाध्यक्ष हिराताई जाधव यांच्यासह महेश उबाळे, सुरज पवार, दत्तू पाटील, बाळासाहेब भोसले, रियाज शेख, सुधाकर बागुल, जयंत गायकवाड, सय्यद हिकमत, अशोक म्हस्के, बाळू शेळके, दिगंबर मोरे, रवी पाटणे, सत्यजित तांबे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटबाजी चव्हाट्यावर...
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी उपसभापती ॲड. प्रताप निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका गटनेते विशाल शेळके, माजी तालुका अध्यक्ष विजय पवार, माजी सभापती एल. एम.पवार, गणेश चव्हाण, शैलेश सुराशे, ज्ञानेश्वर घोडके, जगदीश पवार, अल्पसंख्य तालुका अध्यक्ष जावेद शेख, शिवप्रसाद डमाळे, नितीन तांबे, अशोक देवकर आबासाहेब कळमकर आदी उपस्थित नव्हते. यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
0 Comments