news today, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस ; शिवना टाकळीतून 27 हजार 474 क्युसेकने पाणी विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा....

जफर ए.खान
-------------------------

वैजापूर, ता.16 - पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याने प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे 27474.81 क्युसेसने पाणी विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मोहम्मद अशफाक यांनी दिली.

शिवना टाकळी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे 27474.81 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शिवना टाकळी मध्यम प्रकल्प, ढेकू मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प व मन्याड साठवण तलाव या प्रकल्पांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मन्याड साठवण तलाव 100 टक्के भरले आहे तर शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात 100 टक्के, ढेकु मध्यम प्रकल्पात 80 टक्के व कोल्ही मध्यम प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (ता.15) रात्री 11.45 ते 12 दरम्यान शिवना टाकळी धरणातून 5 गेटव्दारे 10587.69  क्युसेकने होत असलेला विसर्ग वाढवून 23978.65  क्युसेकने विसर्ग शिवना नदीपात्रात करण्यात आला. रात्री 12.55 ते 01.10 दरम्यान 23978.65 ने होत असलेला विसर्ग वाढवून 27474.65 क्युसेक करण्यात आला.
धरणात येणारी पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे अशी माहिती उपअभियंता मोहम्मद अशफाक यांनी दिली.

-------------------------------------------------------------------

                   🔺विसर्ग वाढ अलर्ट🔺

          शिवना टाकळी मध्यम प्रकल्प. कन्नड

दि.16/09/2025 रोजी रात्री 12.55 ते 01.10 दरम्यान शिवना टाकळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवना टाकळी धरणातून 05 गेटद्वारे 23978.65 कुसेक्सनी होत असलेला विसर्ग वाढवून 05 गेटद्वारे एकूण 27474.81 कुसेक्स विसर्ग शिवना नदीपात्रात करण्यात येत आहे.
           धरणात पाण्याची येणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. 
 
         🔴 नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे 🔴

                      कार्यकारी अभियंता
           छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग
                    वछत्रपती संभाजीनगर
---------------------------------------------------------------------------








Post a Comment

0 Comments