तातडीने पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश ..
वैजापूर, ता.24 - प्रतिनिधी - राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी ता .(24) वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भग्गाव, कापुसवाडगाव, वीरगाव या भागाला थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन शेत पिकांची पाहणी केली तसेच नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर तसेच ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी व सर्व विभागांचे प्रमुख होते. सावे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
वीरगाव परिसरात मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून भग्गाव परिसरात सोयाबीन, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे भरीव मदत देण्याची ग्वाही सावे यांनी यावेळी दिली. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा दिलासाही दिला. यावेळी स्थानिक शेतकरी अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सावे यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, प्रशांत कंगले, दशरथ बनकर, अविनाश गलांडे, कचरू डिके, मधुकर वालतुरे , कल्याण दांगोडे, ज्ञानेश्वर जगताप, प्रभाकर बारसे, मंजाहरी गाढे, ज्ञानेश्वर आदमाने, गोकुळ भुजबळ, दामोदर पारिक, महेश भालेराव, प्रवीण सोमवंशी, प्रवीण तांबे, अमोल मलिक, सुनील गायकवाड उपस्थित होते.
राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी
वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला.
0 Comments