news today,गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणानिमित्त वैजापूर शहरात पोलिसांचे पथसंचलन

वैजापूर, ता.  03 /प्रतिनिधी - गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पडावे व या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांतर्फे शहरात पथसंचलन करण्यात आले.

शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या  पथसंचलनात पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक व होमगार्ड सहभागी झाले होते. नागरिकांनी शिस्त पाळावी व सौहार्द जपावे असे आवाहन करण्यात आले. सणांच्या काळात कोणी कायदा व सुव्यवस्थेचा भंग केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. शहरात शिस्तबध्द व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा संदेश या पथ संचलनातून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments