मुंबई, ता 03 - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर शुक्रवार (ता.29) ऑगस्टपासून सुरू केलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले. जरांगे यांनी केलेल्या बहुतेक मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. त्यासंदर्भात तातडीने जीआर काढण्याची तयारीही दर्शवली. मागण्या मान्य झाल्याचे जरांगे यांनी स्वतः जाहीर केल्यानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मंगळवारी (ता.02) मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सदस्यांसह चर्चा केल्यानंतर उपोषण सोडले. यावेळी शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे हे उपसमितीमधील सदस्य उपस्थित होते.
मान्य झालेल्या मागण्या ...
1- हैद्राबाद गॅझेटची तत्काळ अंमलबजावणी करणार
2 - मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व व नोकरी देणार
3 - 58 लाख कुणबी नोंदींची माहिती ग्रामपंचायतीत लावणार
4 - अंदोलकांवरील गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेणार
5 - न्या. संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ
0 Comments