news today, सीसीआयकडून राज्यात कापूस खरेदी सुरू ; कापूस नोंदणीला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

छञपती संभाजीनगर, ता 16 - भारतीय कपास निगम (सीसीआय) कडून राज्यात बुधवारपासून (ता.15) कापूस खरेदी सुरू झाली आहे. केंद्र शासनाने 2025-2026 या वर्षाच्या हंगामातील कापसासाठी मध्यम लांबीच्या धाग्याकरिता 7710 तर लांब धाग्याकरिता 8110 रुपयांचा हमीभाव निश्चित केला आहे. सीसीआयकडून कपास किसान' ॲपवर कापूस नोंदणीला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यावर्षी अतिवृष्टीचा फटका बसत कापसाची प्रत खालावली आहे. त्याचबरोबर उत्पादकतेवर देखील परिणाम झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बाजारात दर हमीभावापेक्षा कमी राहतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात भारतीय कापूस महामंडळावर (सीसीआय) कापूस खरेदीचा दबाव राहणार आहे. 

सीसीआयच्या कापूस नोंदणीला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ ...

भारतीय कपास निगम (सीसीआय) तर्फे शेतकऱ्यांसाठी कापूस नोंदणीची अंतिम मुदत येत्या 31ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कापसाची हमी भावाने विक्री करता यावी म्हणून भारतीय कपास निगम (सीसीआय) च्या वतीने ' 'कपास किसान' या मोबाईल ॲपवर स्व नोंदणीची सुविधा 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत खुली होती.शेतकऱ्यांच्या आणि राज्य सरकारच्या मागणीवरून त्यात 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपली स्व नोंदणी कपास किसान या मोबाईल ॲपवर दिलेल्या मुदतीत करावी. असे आवाहन सीसीआयच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments