news today, मोटारसायकल उभ्या ट्रकवर धडकून दोन युवक ठार

महालगाव शिवारात पंचगंगा साखर कारखान्याजवळील घटना 

वैजापूर, ता.16 - रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मोटारसायकल धडकून दोन युवक ठार झाले. ही घटना वैजापूर - गंगापूर रस्त्यावर महालगाव शिवारात पंचगंगा साखर कारखान्याजवळ मंगळवारी (ता.14) रात्री साडे बाराच्या वाजेच्या सुमारास घडली.

सुरज संजय गायकवाड (वय 23 वर्ष) रा श्रीरामपूर व सुमीत विलास धोत्रे (वय 20 वर्ष) रा बारामती अशी मयत युवकांची नावे आहेत. गायकवाड व धोत्रे हे दोघे  पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम करत होते. काम आटोपून दोघे जण मोटारसायकल (एम एच 03 इ झेड 5274)  वर गंगापूर हुन वैजापूर कडे येत होते.त्यावेळी महालगाव शिवारात रस्त्यावर नादुरुस्त ट्रक (टी एस 15 यु डी २2415 ) हा उभा होता. या उभ्या ट्रकवर पाठीमागून मोटारसायकल धडकल्याने दोघा युवकांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अशोक माने, हवालदार विजय बाम्हदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली. विकी संकपाळ यांनी रुग्णवाहिकेतून दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.वसकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अशोक माने, हवालदार विजय बाम्हदे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मयत यांच्या संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.यामुळे वाहतूक विस्कळित झाली.

Post a Comment

0 Comments