पूरग्रस्तांना किराणा सामान चे किट वाटप करताना
वसंत क्लबचे सचिव जफर खान....
वैजापूर, ता. 17 - शहर व तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक कुटुंब संकटातून बाहेर येऊ शकलेली नाहीत. अशा बिकट परिस्थितीत वसंत क्लब वैजापूर या संस्थेच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाख रुपयांचा मदतनिधी व शहरातील पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळी सण गोळ व्हावा यासाठी किराणा समानचे 400 किट वाटप करून मदतीचा हात देण्यात आला.
सामाजिक बांधिलकी म्हणून वसंत क्लब वैजापूर या संस्थेतर्फे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांसह घरे व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. पुरामुळे वैजापूर शहरातील नारंगी नदीकाठच्या दत्तनगर, आदिवासी वस्ती, इदगाहनगर, वान वाडी या भागातील घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून बाधित कुटुंबीयांना आधार व्हावा यासाठी नेहमीप्रमाणे वसंत क्लब या संस्थेच्यावतीने मदतीचा हात म्हणून पूरग्रस्त 400 कुटुंबांना किराणा समान किटचे वाटप करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांना मदतीचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द करताना वसंत क्लबचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.जी.शिंदे, सचिव जफर खान, सहसचिव डॉ.संतोष गंगवाल ...
यावेळी क्लबचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.जी.शिंदे, सचिव जफर खान, सहसचिव डॉ. संतोष गंगवाल यांच्यासह कार्यकारिणी सदस्य मेजर सुभाष संचेती, ॲड.बाबुराव परदेशी, कय्यूम सौदागर, भगवानसिंग राजपूत, ॲड. संजय बत्तीसे, क्लबचे व्यवस्थापक वसंतराव कदम, सागर अस्वले आदी यावेळी उपस्थित होते.
0 Comments