वैजापूर, ता .15 - धनगर व बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आदीवासी समाजाच्यावतीने वैजापुर उपवीभागीय आधीकरी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनगर व बंजारा समाजाला एस टी आरक्षण देऊ नये .या मागणीचे निवेदन देण्यात आले.
धनगर व बंजारा यांना एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आदीवासी समाजाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केले .या प्रसंगी अशोक बर्डे, दिपक बर्डे, सूरज बर्डे, विठ्ठल खैरे, संभाजी मोरे, शिवाजी मोरे, गोरख पवार, रोहीदास माळी, सपना मोरे, संगीता माळी, उज्वला निकम, सीमा पवार, शिला माळी, बाबासाहेब काकडे, संजय काकडे, सुभाष मोरे, विक्रम काकडे, गीताराम काकडे, भावराव काकडे, गोकुळ काकडे, हनुमान शिंदे आदींची उपस्थिती होती.
0 Comments