मुंबई, ता.18 - राज्यात सद्या उन्हाच्या कडाक्यासह उकाळा आणि ढगाळ वातावरणही अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
एकीकडे पावसाची शक्यता असताना सांताक्रूझ येथे शुक्रवारी 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. संपूर्ण राज्यात शुक्रवारी सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. मोसमी पावसाने शुक्रवारी संपूर्ण देशातून माघार घेतली. याचबरोबर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागात 34 ते 36 अशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे असहय उकाडा सहन करावा लागत आहे.
0 Comments