news today, बीड येथे ओबीसींचा एल्गार ; जातगणनेची एकमुखी मागणी


बीड, ता.18 - ओबोसी समाजाने कधीही मराठा समाजाचा विरोध केला नाही.ओबीसी आणि मराठा समाजात दुही निर्माण करण्याचे काम आंतरवाली सराटीतून झाले. असा आरोप करत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसींचे नेते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य केले. भाजपने ओबीसींना कायम गृहीत धरू नये, हा ''डीएनए' कधीही सरकू शकतो असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी दिला.


बीड येथे शुक्रवारी (ता.17) ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ,आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, नवनाथ वाघमारे, अब्बास अन्सार, मनोहर धोंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नामोल्लेख न करता राज्य सरकारने घेतलेल्या हैद्राबाद गॅझेटच्या निर्णयावर कडाडून टीका केली. देशात जातगणना करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. 


Post a Comment

0 Comments