जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान संपण्याच्या वेळेपासून 48 तास आधी प्रचार थांबण्याची तरतूद आहे. तर नगरपालिका आणि नगरपंचायत कायद्यात मतदानाच्या दिवशी प्रचार करता येणार नाही, अशी तरतूद आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पत्र काढून मतदानाच्या आदल्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोमवार रात्री 10 वाजल्यानंतर सार्वजनिक सभा,प्रचार फेरी, ध्वनिक्षेपकाचा वापर यावर पूर्णपणे बंदी लागू असेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
0 Comments