news today, नांदगाव - शिऊर बंगला रस्त्याचे काम सुरू ; छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव- धुळे ; पर्यायी अवजड वाहतुक मार्ग

छत्रपती संभाजीनगर, ता.28 - छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव- धुळे कडे जाणाऱ्या मार्गावर नांदगाव तलवाडा घाट शिवुर बंगला या भागात रस्त्याचे काम सुरु असल्याने ता .25 नोव्हेंबर 2025 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत सर्व प्रकारची अवजड- जड वाहतुकीसाठी  पर्यायी वाहतुक मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सर्व वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,असे आदेश पोलीस अधीक्षक ग्रामिण डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

१. छत्रपती संभाजीनगर कडून कन्नड व तलवाडा घाटातून चाळीसगावकडे जाणारी वाहतुक आता छत्रपती संभाजीनगर- साजापूर- लासूर- गंगापूर चौफुली- वैजापूर- येवला- मनमाड- चाळीसगाव धुळेकडे जाईल.
२. छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड व तलवाडा घाटातून धुळ्याकडे जाणारी वाहतुक आता छत्रपती संभाजीनगर- साजपूर-(सोलापूर- धुळे मार्गाने) माळीवाडा समृद्धी महामार्गाने झांबरगाव पर्यंत तेथून खाली उतरुन गंगापूर चौफुली वैजापूर- वैजापूर येवला- मनमाड मार्गे धुळेकडे जाईल.
३. छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव –धुळे कडे जाणारी जड वाहतुक  आता छत्रपती संभाजीनगर साजापूर- कसाबखेड फाटा- देवगाव रंगारी- शिऊर- वैजापूर मार्गे येवला- मनमाड- चाळीसगाव मार्गे धुळेकडे जाईल.

Post a Comment

0 Comments