नगराध्यक्षपदासाठी भाजपचे दशरथ बनकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.
वैजापूर, ता.14 - नगरपालिका निवडणुकांसाठी आता हळूहळू रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता.14) वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी आणखी एक तर नगरसेवकपदासाठी 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे आतापर्यंत पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी दोन तर नगरसेवकपदासाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. दरम्यान, शनिवारी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून आता केवळ तीनच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर यांनी
नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
वैजापूर नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी (14 नोव्हेंबर) सात प्रभागातून एकूण 15 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे दशरथ बनकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. दशरथ बनकर व माधुरी बनकर या दांपत्याने प्रभाग क्रमांक 11 अ मधून सदस्य पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज भरला आहे. त्यामुळे नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता 35 झाली आहे तर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे संजय बोरनारे व भारतीय जनता पक्षाचे दशरथ बनकर या दोघांतर्फे अर्ज भरण्यात आले आहेत.
शुक्रवारी प्रभाग क्रमांक तीन ब मधून शेख मिराण इरफान (शिवसेना), शेख जाफर हाजी हुसेन (शिवसेना), प्रभाग क्रमांक 6-अ मधून सुनिता चंद्रशेखर साखरे, 7-अ मधून प्रशांत उत्तमराव त्रिभुवन (शिवसेना), 7-ब मधून अर्चना राजेंद्र साळुंके (शिवसेना), 9-ब मधून सोनल श्रीकांत साळुंके (शिवसेना),10-अ मधून ज्योती ज्ञानेश्वर टेके (शिवसेना), 10- ब मधून ज्ञानेश्वर वैजिनाथ टेके (शिवसेना) व शेख हमीद शेख हुसेन कुरेशी (शिवसेना), 11-अ मधून ऋषिकेश विष्णू वाघ (शिवसेना), माधुरी दशरथ बनकर (भाजप) व दशरथ भगवान बनकर (भाजप), 12-क मधून साक्षी सुरेंद्र सुतवणे या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत.
0 Comments