news today, नगरपालिका निवडणूक ; रविवारीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

ऑफ लाईन अर्ज भरता येणार ...निवडणूक आयोग 


मुंबई, राज्यातील नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पध्दतीने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. याशिवाय आज शनिवार आणि उद्या रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्विकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता.14) या निर्णयाबाबतची माहिती दिली. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठी तसेच थेट अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु विविध राजकीय  पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज भरण्याची सवलत देण्याची मागणी केली होती. 

या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज भरण्याची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज शनिवारी आणि रविवारी या दोन्ही सुटीच्या दिवशीही दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 रोजी  दुपारी 3 वाजेपर्यंत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments