माजी नगराध्यक्ष साबेर खान यांचा प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान ..
वैजापूर, ता.15 - वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज सहाव्या दिवशी शनिवारी (ता.15) नगरसेवकपदासाठी तब्बल 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे आतापर्यंत पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी दोन तर नगरसेवकपदासाठी 95 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी मात्र आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. याआधी संजय बोरनारे (शिवसेना) व दशरथ बनकार (भाजपा) या दोघांनी नगराध्यक्षपदासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहणार असून रविवारीही इच्छुकांना आपले अर्ज भरता येणार असल्याने अजून दोन दिवस अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
आज शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष साबेरखान अमजदखान, ताहेर खान (सुलतान), विजया राजीव डोंगरे, पारस घाटे, शेख अकिल गफूर, गोकुळ भुजबळ, राजेश गायकवाड, बजरंग मगर, काजी अब्दुल मलिक सदरुद्दीन, पुंडलिक गायकवाड, किरण व्यवहारे, सय्यद अमीर अली आदींसह साठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
शिवसेना पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 6 मधून ताहेर खान (सुलतान) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
वैजापुरात भाजप, उबाठा सेनेचा सस्पेन्स कायम ..
अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडूनही अद्याप एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही. भाजपा सेना युती होणार का, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कुणासोबत जाणार, डॉ दिनेश परदेशीं अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार का हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आज सहाव्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक 1 - घाटे पारस अंबादास, ॲड. राफे हसन, गोरे ताराबाई उत्तम, शेख मसिरा परवीन मो.अशफाक, बर्डे सुनीता श्रीकांत प्रभाग क्रमांक 2 - खैरे स्वाती विशाल, चव्हाण धनश्री प्रदीप, पवार अर्चना.सुनील, त्रिभुवन नेहा रावसाहेब, गुंड सागर बाळासाहेब प्रभाग क्रमांक 3 - शेख अकील शेख गफुर, शेख रियाज शेख अकील, त्रिभुवन सरला सुभाष, बागुल सुरेखा हरिभाऊ, मोटे शालू गंगाधर, पगारे रीना रवींद्र, त्रिभुवन पूजा अविनाश प्रभाग क्रमांक 4 - उचित संगिता राम, व्यवहारे सविता किरण, व्यवहारे किरण विजय, भुजबळ गोकुळ विलास प्रभाग क्रमांक 5 - साबेरखान अमजदखान, चापानेरकर प्रियंका गिरीष, चापानेरकर गिरीष शरदराव, पवार वैशाली जितेंद्र, धुमाळ प्राजक्ता सिध्देश्वर प्रभाग क्रमांक 6 - खान ताहेर साबेर (सुलतान), काझी अब्दुल मलीक, खान साबेर अशरफ, राजपूत दिपा विनोद, पोकर्णे मेहुल कृष्णदास, भाटिया शिल्पा सागर, धुमाळ प्राजक्ता सिध्देश्वर, अल्ताफ मो.,अक्रम प्रभाग क्रमांक 7 - त्रिभुवन बबन माधव, राजपूत नीता पंकज, चव्हाण सविता शैलेश प्रभाग क्रमांक 8 - पुतळे साईप्रसाद सुखदेव, पुतळे बाबासाहेब सुखदेव, मगर बजरंग अंकुशराव प्रभाग क्रमांक 9 - शेख बिलाल हुसेन, राऊत सचिन सुंदरलाल, शांताबाई सुंदरलाल, सय्यद अमिर अली महेबुब अली प्रभाग क्रमांक 10 - कुरेशी नवीद हमीद, शेख कय्यूम अमीर, प्रभाग क्रमांक 11 - डोंगरे विजया राजीव, गायकवाड वैशाली संदीप, ठोंबरे सुवर्णा विजय, गायकवाड पुंडलिक परसराम प्रभाग क्रमांक 12 - पवार सुनील चिंतामण, डोंगरे ज्योती शिरीष, जाधव निर्मलाबाई बाळासाहेब, शिंदे विशाल अर्जुन, गायकवाड राजेश बळवंता या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत.
0 Comments