news today, वैजापूर पालिका निवडणूक ; नगराध्यक्षपदासाठी डॉ.दिनेश परदेशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नगरसेवक पदासाठी 45 तर अध्यक्षपदासाठी 2 अर्ज दाखल 

.

वैजापूर येथे भारतीय जनता पक्षाचे डॉ दिनेश परदेशी यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

वैजापूर, ता.16 - नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज सातव्या दिवशी रविवारी (ता.16) वैजापुरात नगरसेवक पदासाठी 45 तर नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वैजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे डॉ दिनेश परदेशी व दशरथ बनकर (अपक्ष) यांनी रविवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्याकडे दाखल केला. तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या 45 जणांनीही आज आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे शहरातील बारा प्रभागातील 25 जागांसाठी इच्छुकांची संख्या आता 140 झाली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी तीन जणांनी चार अर्ज दाखल केले आहेत.
    
शिवसेना - भाजप महायुतीबाबत चर्चा सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाच्यावतीने नगराध्यक्ष पदासाठी डॉ.दिनेश परदेशी यांनी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे आता स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना आमदार रमेश बोरणारे हे 'ज्याचा आमदार, त्याचा नगराध्यक्ष' या भूमिकेवर ठाम आहेत तर दुसरीकडे भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ. दिनेश परदेशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, डॉ .परदेशी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत 'आज काय आणि उद्या काय ? पक्ष जो आदेश देईल तो आपण मान्य करू' असे सांगितले. यामुळे आता सेनेचे संजय बोरणारे यांच्या विरोधात भाजपकडून ते उमेदवार म्हणून मैदानात उतरणार आहे. हे जवळपास निश्चित झाले आहे. डॉ. परदेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे हाजी अकिल शेख, रविंद्र संचेती, विशाल संचेती, अविनाश गलांडे, उल्हास ठोंबरे, सचिन वाणी, प्रकाश चव्हाण, सुरेश तांबे आदींच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. परदेशीं यांनी अर्ज भरल्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांबाबत कालपर्यंत निर्माण झालेला सस्पेन्स काही प्रमाणात कमी झाला आहे. 
     
रविवारी पूजा क्षीरसागर, रोहिणी आहेर, गजानन त्रिभुवन, प्रियांका चापानेरकर, नीता राजपूत, विलास म्हस्के, सुमन सावंत, अमेर खान, लता वाणी, कविता जाधव, अब्दुल मलिक काझी, संगिता राजपूत, जुनेद पठाण, प्रशांत त्रिभुवन, सुवर्णा जाधव, सुमय्या शेख, सविता धुळे, रावसाहेब त्रिभुवन, सागर राजपूत, संगिता राजपूत, मोनाली साळुंके, अस्मा फिरदोस पठाण, जयश्री राजपूत, अनिता थोरात, साबेर अशरफ खान, जीवन पठारे, गायत्री दायमा, कविता शिंदे, नाजिया शेख, वाजेद सुलतान कुरेशी, पूजा दोडे, प्रकाश चव्हाण, चित्रा चव्हाण, निलेश आंबेकर, मंगलबाई आंबेकर, अर्चना नाईकवाडी, प्रशांत कंगले, विजय त्रिभुवन, सुमय्या सोहेल बक्ष या इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी आपले अर्ज दाखल केले.






  


Post a Comment

0 Comments