वैजापूर, ता.16 - शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी हे अन्य पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे भाजपचे डॉ दिनेश परदेशी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
माजी आमदार आर.एम.वाणी यांच्या कुटुंबीयांनी आज छञपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे डॉ दिनेश परदेशीं यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी बाळासाहेब संचेती, उल्हास ठोंबरे, सुरेश तांबे, प्रकाश चव्हाण, सचिन वाणी उपस्थित होते. डॉ परदेशीं यांनी अर्ज भरल्यामुळे भारतीय जनता पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांबाबत कालपर्यंत निर्माण झालेला सस्पेन्स काही प्रमाणात कमी झाला आहे. येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन वाणी (माजी आमदार दिवंगत आर एम वाणी यांचा मुलगा) यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे ठरवले आहे. त्यांचा रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पक्ष प्रवेश होणार होता. पण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दौरा रद्द झाल्यामुळे हा प्रवेश 18 नोव्हेंबरला मुंबई येथे होणार असल्याचे डॉ परदेशीं यांनी माध्यमांना सांगितले. विरोधकांच्या टिकेला योग्य वेळी उत्तर देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या आदेशानुसार आपण नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्याचे डॉ परदेशी यांनी सांगितले.
0 Comments