वैजापूर, ता.16 - नायलॉन मांजाने गळा चिरल्यामुळे एक युवक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (ता.16) दुपारी वैजापूर शहरात घडली. विशाल विजयकुमार बोथरा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
शहरातील शिवाजी रोडवरील महादेव मंदिर परिसरातून विशाल बोथरा हे मोटार सायकलवर जात असतांना नायलॉन मांजामुळे त्यांचा गळा चिरला गेला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
नायलॉन मांजा आढळून आल्यास कारवाई ...
शहरात बाहेरून कोणी नायलॉन मांजा घेऊन आल्यास किंवा नायलॉन मांजासह पतंग उडवत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. तरी कुणीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन वैजापूर पोलिसांनी केले आहे.
0 Comments