पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वैजापुरात वेग आला असून 'ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष' अशी भूमिका आ. रमेश बोरणारे यांनी घेतल्याने स्थानिक पातळीवर शिवसेना - भाजप युतीमध्ये मतभेद निर्माण होऊन युती दुभंगल्याने शिवसेना - भाजप समोरासमोर उभी ठाकणार असल्याचे चित्र आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर असून शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. तर शिवसेना (उबाठा) आणि शिवसेना शिंदे गटात जागा सोडण्यावरून बोलणी फिसकटली असून शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन वाणी आणि शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण हे भाजपच्या गळाला लागले आहेत. सचिन वाणी यांच्या कुटुंबीयांनी काल छञपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून उद्या ते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
नगरपलिका निवडणुकीत शिवसेना- भाजप युती दुभांगल्याने शिवसेना शिंदे गटातर्फे आ. रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे आणि भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी या दोघांत नगराध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत होणार असे चित्र आहे.
0 Comments