news today, वैजापुरात अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवकपदासाठी 70 उमेदवारी अर्ज दाखल

आतापर्यंत अध्यक्षपदासाठी एकूण 8 तर नगरसेवकपदासाठी 210 उमेदवारी अर्ज दाखल 

.
वैजापूर, ता.18 -  - नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी सोमवारी (ता.17) वैजापुरात नगरसेवक पदासाठी 70 तर नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी सुभाष उत्तमराव गायकवाड यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनी भाजपतर्फे तर संजय बोरणारे यांनी शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
 तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या 70 जणांनीही आज आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे शहरातील बारा प्रभागातील 25 जागांसाठी इच्छुकांची संख्या आता 210 झाली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी तीन जणांनी 8 अर्ज दाखल केले आहेत.
    
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी बोरणारे संजय नानासाहेब (शिवसेना) व गायकवाड सुभाष उत्तमराव (काँग्रेस)) या दोघांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून शेख सुमैय्या सोहेल बक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस), पवार लता गोरख (भाजप), शेख समी अनिस (शिवसेना), शेख अनिस इस्माईल (शिवसेना), खान साबेर अशरफ (अपक्ष), शेख अनिस शेख इस्माईल ( ए आय एम आय एम), सय्यद मुज्जफर सिकंदर (वंचित बहुजन आघाडी), शेख अकील शेख गफुर (राष्ट्रवादी काँग्रेस), शेख समी शेख अनिस ( ए आय एम आय एम) 
प्रभाग क्रमांक 2 मधून संचेती विशाल जीवनलाल (भाजप), मोटे शालू गंगाधर (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रभाग क्रमांक 3 मधून शेख अशरफ यासीन (भाजप), शेख मुदस्सर अन्सार (अपक्ष), खान जबाज रशीद (अपक्ष), शेख रियाज अकील (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रभाग क्रमांक 4 मधून भुजबळ गोकुळ विलास (अपक्ष), मालकर दिपककुमार काशिनाथ (शिवसेना उबाठा), जेजुरकर स्वप्नील विष्णू (शिवसेना)  पठाण हाफिजाबी अशरफ खान (शिवसेना), शेख सबिहा वसीम. (राष्ट्रवादी काँग्रेस) शेख रुखसाना अय्युब (अपक्ष) प्रभाग क्रमांक 5 मधून कुरेशी निकत इम्रान (भा), परदेशी शिल्पा दिनेश (भाजप), दोडे पूजा गौरव (अपक्ष) पवार वैशाली जितेंद्र (अपक्ष), शेख इम्रान रशीद ( भाजप) बोथरा इंदरचंद सुरजमल (भाजप) प्रभाग क्रमांक 6 मधून सय्यद आफरीन अकबर (ए आय एम आय एम) पोकर्ने महुल कृष्णदास (अपक्ष) खान फेरोज इस्माईल ( शिवसेना उबाठा) प्रभाग क्रमांक 7 मधून त्रिभुवन शक्या सिंह अनिल (काँग्रेस), त्रिभुवन दिपक अशोक (राष्ट्रवादी काँग्रेस), त्रिभुवन राजेंद्र उत्तमराव (शिवसेना), प्रभाग क्रमांक 8 मसून गावडे उज्वला गोरख (शिवसेना), नाईकवाडी गणेश मधुकर (भाजप), वाणी प्रवीण रमेश (अपक्ष), चव्हाण प्रदीप नानासाहेब (अपक्ष) प्रभाग क्रमांक 9 मधून शेख मिन्हाज सईद (शिवसेना), आंबेकर कैलास सोमनाथ (काँगेस), भाटे सुरेखा सुरेश (शिवसेना) प्रभाग क्रमांक 10 मधून जोशी ज्योती अनिल (भाजप), बिन बिलेस यासेर युसुफ (राष्ट्रवादी काँग्रेस), कुरेशी अकील लतिफ (राष्ट्रवादी काँग्रेस), शेख कय्युम शेख अमीर (अपक्ष) शेख शमीम बदर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्रमांक 11 मधून गायकवाड पुंडलिक आसाराम (अपक्ष), अभंग धनंजय वसंतराव (अपक्ष), ठोंबरे सुवर्णा विजय (राष्ट्रवादी काँग्रेस), मगर सोनाली चंद्रशेखर (शिवसेना), पारीक सीमा दामोदर (भाजप) प्रभाग क्रमांक 12 मधून त्रिभुवन सुनील भास्कर (अपक्ष), बागुल सिध्दार्थ सुरेश (वंचित बहुजन आघाडी), पवार सुनील चिंतामण (शिवसेना), अमोल नानासाहेब दिवे (अपक्ष), वाघ संदीप सखाहरी (राष्ट्रवादी काँग्रेस) नन्नवरे शुभम मनीष (शिवसेना उबाठा), आंबेकर  रेखा  महेश (काँग्रेस), नाईकवाडी अर्चना दिनेश (भाजप), जाधव प्रतीक्षा सोपान (मनसे) या इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी आपले अर्ज दाखल केले.






  


Post a Comment

0 Comments