वैजापूर, ता.17 - नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी छञपती संभाजीनगर जिल्हयातील सहा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी 47 तर नगरसेवकपदासाठी 571 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
आतापर्यंत जिल्हयातील 6 नगरपालिका व एक नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण 88 तर नगरसेवक पदासाठी 1 हजार 312 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगरपालिकानिहाय आज शेवटच्या दिवशी सोमवारी (ता.17) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
नगरपालिका उमेदवारी अर्जांची संख्या
---------------- ---------------------------------
नगरसेवकपद - अध्यक्षपद
सिल्लोड नगरपालिका 103 11
कन्नड नगरपालिका 60 01
पैठण नगरपालिका 122 08
वैजापूर नगरपालिका 70 04
गंगापूर नगरपालिका 69 06
खुलताबाद नगरपालिका 67 09
फुलंब्री नगरपंचायत 80 08
------------------------------------------------------------------------
0 Comments