news today, अखेर प्रतीक्षा संपली..! नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 2 डिसेंबरला मतदान

आजपासून निवडणुक आचारसंहिता लागू ...

मुंबई, ता.04 - गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. यासाठी 1 जुलैपर्यंत 
नोंदणी झालेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे. या निवडणुकीत 1 कोटी 7 लाख, 3 हजार 576 हजार मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसतील. असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक कार्यक्रम असा ...

उमेदवारी अर्ज दाखल करणे  - 10 ते 17 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जांची छाननी.     - 18 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 25 नोव्हेंबर 2025
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी - 26 नोव्हेंबर 2025
मतदान तारीख - 2 डिसेंबर 2025
मतमोजणीची तारीख  - 3 डिसेंबर 2025


Post a Comment

0 Comments