news today, गुरुनानकजी जयंतीनिमित्त वैजापूर गुरुद्वारा समितीच्यावतीने भरगच्च कार्यक्रम

वैजापूर, ता.04 - शीख धर्मगुरू गुरूनानकजी यांच्या जयंती निमित्ताने येथील गुरुद्वारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता.04) रोजी गुरुद्वारात भजन, गुरुवाणी, निशाण साहिबचे चोला(वस्त्र) बदलण्याचा  कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. गुरुद्वारा समितीचे  दिलजीतसिंग खनिजो, पोथीवालजी, नंदकुमार आहुजा, रितेश आहुजा, कपिल आहुजा व सागर आहुजा यांनी त्यांचे स्वागत केले. 

.       गुरुद्वारात तयारी चालू असतांना भक्त भाविक

गुरूद्वारा समितीच्यावतीने जयंती निमित्त गुरूनानकजी प्रतिमा शोभा मिरवणूक, रक्तदान शिबिर, लंगर (प्रसाद) भोजन, गुरुवाणी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शहरातील सर्व शिख बंधू - भगिनी कार्यक्रमात सहभागी आहेत. बलविंदर पोथीवाल, प्रीती खनिजो, जीत खनिजो, अमरजित आहुजा, सिद्धी आहुजा, हरमित खनिजो, दीपा सिखोंन,अमरप्रित सबरवाल, स्वीटी आहुजा, रचना वधवा, ज्योती आहुजा, शोभा खनिजो, कविता वधवा यांच्या सहभागाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
 

Post a Comment

0 Comments