news today, नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकांना आव्हान ; 28 याचिका दाखल, हायकोर्टात आज सुनावणी

मुंबई, ता.04 - आगामी नगरपरिषद, नगरपंचायती व. जिल्हा परिषद निवडणुकांना आव्हान देणाऱ्या तब्बल 28 याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. सीमांकन, मतदार यादी व प्रभाग आरक्षण या मूळ मुद्द्यांवर या याचिका दाखल झाल्या आहेत.
मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर व न्यायाधीश गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली. यातील काही याचिका छञपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठात वर्ग करण्यात आल्या आहेत. काही याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आल्या आहेत. काही याचिका मुंबई उच्च न्यायालय येणाऱ्या सहा जिल्ह्यातील आहेत. या याचिकांचे राज्य शासनाने प्रत्युत्तर सादर केलेले नाही.असे मुख्य सरकारी वकील नेहा भिडे यांनी न्यायालयाला सांगितले.
यातील कोणत्या याचिका कोणत्या मुद्द्यांसाठी दाखल झाल्या आहेत याचे वर्गीकरण करा, काही मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले आहेत असे स्पष्ट करत खंडपीठाने यावरील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली. 

Post a Comment

0 Comments