वैजापूर, ता.12 -वैजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकी च्या अनुषंगाने दुबार मतदार हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार नोंदणी आढळून आल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरूण जऱ्हाड यांनी दिला आहे.
वैजापूर नगर परिषद अंतर्गत 949 मतदारांची नावे दोन किंवा दोन पेक्षा जास्त ठिकाणी आढळून आलेले आहेत. तसेच 270 मतदारांची नावे शहरात व ग्रामीण भागात आढळून आलेले आहेत.
तसेच बऱ्यांच वर्षापासून वैजापूर शहरातून स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे येथील मतदार यादीत दिसून येतात. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव नोंद असणे हा कायदेशीर गुन्हा आहे.तसेच मतदाराकडे दोनपेक्षा जास्त ओळखपत्र असणे हा कायदेशीर गुन्हा आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडून संबधित संभाव्य दुबार मतदारांना समंतीपत्र (प्रपत्र-अ) पाठविण्यात येत आहे. त्या समंतीपत्रावर आपले नाव कोणत्या यादी भागामध्ये अथवा प्रभागामध्ये अथवा गावामध्ये ठेवण्यात यावे. या विषयी समंतीपत्र भरून संबधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांचे कडे जमा करावेत. तसेच एकापेक्षा जास्त मतदान ओळखपत्र असल्यास ते संबधिता कडे जमा करावे. असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी डॉ अरूण जऱ्हाड यांनी केले आहे.
विहित मुदतीनंतर संबधितांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल.असा इशारा डॉ अरूण जऱ्हाड यांनी दिला.
0 Comments