शिवसेना नेते चंद्रकांत खैरे घेणार पदाधिकार्यांकडून आढावा
छत्रपती संभाजीनगर, ता .09 - आगामी नगर परिषद - नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सोमवारी (ता 10) जिल्हाभरात बैठकाचे आयोजन केले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे स्थानिक पदाधिकारी, निरीक्षक आणि शिवसैनिक, पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेणार आहेत. यावेळी सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
सोमवार, 10 रोजी सकाळी 11 वाजता गंगापूर, दुपारी 12.30 वाजता वैजापूर, 3 वाजता कन्नड आणि सांयकाळी 5 वाजता रत्नपूर येथे बैठका पार पडणार आहे. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासमवेत शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडीया, माजी महापौर सुदाम सोनवणे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, विजय वाघमारे, हिरालाल सलामपुरे, श्रीरंग आमटे पाटील, विधानसभा संघटक डॉ.अण्णासाहेब शिंदे, विरभद्र गादगे, माजी नगरसेवक अविनाश कुमावत, विनोद सोनवणे, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, दिग्विजय शेरखाने, तालुकाप्रमुक दिनेश मुथा, संजय मोटे, सचिन वाणी, राजू वरकड, उपशहरप्रमुख सुरेश कर्डिले, प्रमोद ठेंगडे पाटील, नरेश मगर, युवासेनेचे उमेश मोकासे, विठ्ठल डमाळे, सरचिटणीस किरण तुपे, महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, सुनिता देव, आशा दातार, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
0 Comments