सावे, व्यासपीठावर आ.प्रशांत बंब व डॉ.दिनेश परदेशी
शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शहरातील मुरारी पार्क येथील शिवसेना संपर्क कार्यालयात आमदार रमेश पाटील बोरणारे, छञपती संभाजीनगर जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा माजी आमदार अण्णासाहेब पाटील माने, लोकसभाप्रमुख माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
शिवसेना पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार अण्णासाहेब माने, व्यासपीठावर आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप
या बैठकीत शहरातील 12 प्रभागातील अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आ.रमेश पाटील बोरणारे यांचे धाकटे बंधू संजय पाटील बोरणारे यांच्यासह अन्य काही इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी तर नगरसेवकपदासाठी प्रभाग क्रमांक एक मधून पारस घाटे व माजी नगरसेवक सखाहरी बोर्डे यांच्या सूनबाई, प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक संदीप बोर्डे व वसंत त्रिभुवन, प्रभाग क्रमांक तीन मधून इरफान शेख व जाफर शेख, प्रभाग क्रमांक चार मधून नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, प्रभाग क्रमांक पाच मधून सुरेश धुमाळ व कमलेश आंबेकर, प्रभाग क्रमांक सहा मधून ताहेर खान (सुलतान साबेर खान) व सागर भाटीया, प्रभाग क्रमांक सात मधून प्रशांत त्रिभुवन, प्रभाग क्रमांक आठ मधून शैलेश चव्हाण, प्रभाग क्रमांक नऊ मधून आमेर अली, प्रभाग क्रमांक दहा मधून हमीद कुरेशी व महेश बुणगे आदींनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही आजच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती. राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, गंगापूरचे आमदार तथा निवडणूकप्रमुख प्रशांत बंब, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या बैठकीत नगरपालिका व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यात आली. नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणीही यावेळी करण्यात आली. लाडगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण लॉनमध्ये झालेल्या भाजपच्या या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर यांनी मुलाखत दिली. तर नगरसेवकपदासाठीही अनेक इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.
या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेऊन आगामी रणनीती ठरविण्यात आली. तसेच महायुती सरकारने शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
तसेच एकजुटीने समन्वयाने आणि सकारात्मक कार्यपद्धतीने विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, बाळासाहेब संचेती, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, ज्ञानेश्वर जगताप, भाजप युवा मोर्चाचे विशाल संचेती यांच्यासह जिल्हापदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments