डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
वैजापूर ता.26 - आज देशाला संविधान स्वीकारून 77 वर्ष कालावधी लोटत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेला अनमोल ठेवा संविधान हा देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय ग्रंथ आहे. या ग्रंथांच्या सन्मानार्थ व डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनार्थ शहरातील सर्व थरातील नागरिक बुधवारी (ता,26) या भारतीय संविधान दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत पुतळ्याला अभिवादन केले.
भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामूहिक उद्धेशिका वाचन करतांना आ.बोरणारे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर
यावेळी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपुत यांनी प्रास्ताविक करून उद्देशीका वाचन ही केले. आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव, सुभाष गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंह राजपूत, राजेश गायकवाड, शैलेश चव्हाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत, शाहीर अशोक बागुल, जगन गायकवाड, दिलीप अनर्थे, बाबासाहेब गायकवाड, आबासाहेब जेजुरकर, साहेबराव पडवळ, सुनील त्रिभुवन, विलास म्हस्के, तांबूस आप्पा, हमिद कुरेशी, रवी बनकर, श्रीमती धिवरे, राजधर त्रिभुवन, दिलीप कुंदे, प्रदीप साळुंके, विजय बाबा त्रिभुवन, विशाल शिंदे, चंद्रसेन भोसले, राहुल त्रिभुवन, ताराचंद त्रिभुवन, विठ्ठल भालेराव ,सुनील पवार,सतीश धुळे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. सुनील त्रिभुवन यांनी आभार मानले.
0 Comments