वैजापूर, ता .03 -- महिला वकिलास जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या तीन जणांविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना न्यायालयाच्या आवारात बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲड. प्रतिक्षा दिलीप उबाळे यांनी आरोपी मतसागर यांच्याकडे कोर्ट फिसची मागणी केली. त्यावेळी इतके पैसे कसे झाले.असे म्हणून मतसागर यांनी उबाळे यांच्याशी वाद घातला. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून लोट लाट केली. या प्रकरणी प्रतीक्षा उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भास्कर भिकाजी मतसागर, साईनाथ रामराव मतसागर व रामहरी शिवनाथ मतसागर सर्व रा जरुळ या तीन जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे हे करीत आहेत.
0 Comments