वैजापूर नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सातमधून प्रशांत त्रिभुवन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
वैजापूर, ता.11- वैजापूर नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवार) केवळ एका इच्छुकाने आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्याकडे दाखल केला. यावेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सुनील सावंत उपस्थित होते. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत उत्तमराव त्रिभुवन यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून शिवसेना पक्षातर्फे प्रभाग क्रमांक सातमधून हा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत संजय बोरनारे, रावसाहेब मोटे, अक्षय कुलकर्णी उपस्थित होते.
0 Comments