news today, जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ? दोन दिवसांत घोषणा होण्याची शक्यता

मुंबई, ता.10 - जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण मर्यादा पाळण्यात आल्याने या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 रोजी निकाल लागणार आहे. मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये ग्रामीण आणि शहर अशी सरमिसळ असल्याने तेथील निवडणूक अधिकारी उपलब्ध नाहीत. परिणामी 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे आयोगाला शक्य नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच आचारसंहितेसाठी पुरेसा वेळ देणेही आवश्यक असल्याने सहा किंवा सात फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,, छञपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, आणि लातूर या बारा जिल्हा परिषदांमध्ये आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण मर्यादा पाळण्यात आली आहे. याठिकाणी निवडणुकांबाबत कोणतीही अडचण नाही. 

Post a Comment

0 Comments